वैद्यकीय आरोग्य विभाग ( रुग्णालय )
उपकेंद्र
या उपकेंद्रांमध्ये प्रसुतीपूर्व तपासणी, किरकोळ आजारांवर उपचार, माता आणि बाल आरोग्य सेवा, संशयीत क्षय, हिवताप, आणि कुष्ठरुग्णांची तपासणी, औषधोपचार आणि आरोग्य शिक्षण अशा आरोग्य सेवा पुरविल्या जातात. प्रत्येक उपकेंद्रात एक बहुविध आरोग्य सेवक (पुरुष), एक बहुविध आरोग्य सेवक (महिला) आणि एक अर्धवेळ महिला परिचर असते. याशिवाय काही उपकेंद्रांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बहुविध आरोग्य सेवक (महिला) कार्यरत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्र
उपकेंद्रांमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवाशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अतिरिक्त सेवा पुरविल्या जातात. त्या पुढील प्रमाणे आहेत –
बाह्य रुग्ण विभाग, ६ खाटांचा अंतररुग्ण विभाग, तातडीच्या सेवा, शस्त्रक्रिया व प्रयोगशाळेच्या सुविधा, विविध आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी, कुटुंब कल्याण सेवा आणि उपकेंद्रातून संदर्भित निर्देशित करण्यात आलेल्या रुग्णांचे उपचार .
प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्गाची संख्या १५ असून स्वच्छता व रुग्णवाहिका सेवा करारपद्धतीने देण्यात येतात.
- Log in to post comments