स्वच्छता
शहरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणेसाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. शहरात पाण्याच्या अनुक्रमे १) ७ लाख २) ७.५ लाख ३) ७.५ लाख लिटर्स क्षमता असलेल्या पाण्याच्या टाक्या असून सदर टाक्यांना ११ किलोमीतर अंतरावरून कृष्णा नदीतून दोन टप्प्यातून पाणी पुरविले जाते.उरुण -इस्लामपूर नगरपरिषद ही वॉटर मीटरद्वारे पाणीपट्टी आकारणी करणारी राज्यातील कदाचित एकमेव नगरपरिषद आहे.या गावापासून १० कि.मी अंतरावर नरसिंगपूर आहे.इस्लामपूर शहरामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयासारखी काही नामांकित महाविद्यालये आहेत त्यामध्ये के.आर.पी.कन्या,मालती कन्या तसेच आर.आय.टी.महाविद्यालयासारख्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा ही समावेश होतो. इस्लामपूर हे निमग्रामीन असे शहर आहे.या शहराचा मुख्य भाग उरुण आहे तेथूनच खऱ्याअर्थाने शहराचा विस्तार झाल्याचा पहावयास मिळतो.म्हणूनच या शहराच्या आदि उरुण हे नाव लावले जाते उरुण -इस्लामपूर असे म्हंटले जाते.या उरुण भागामध्ये शंकराचे मोठे मंदिर आहे.तेथे दरवर्षी शंभूआप्पाच्या नावाने आठ दिवस मोठया प्रमाणात उरूस भरतो.इस्लामपूर शहराच्या बाजूला राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना व त्या लगत मोठे राम मंदिर आहे.मंदिराच्या लगत राजारामबापू पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.