शिक्षण
शहरामध्ये विविध प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आहेत.मराठी माधामिक शाळांमध्ये प्रामुख्याने आदर्श बालक मंदीर, इस्लामपूर हायस्कुल , विद्यामंदिर , सद्गुरू विद्यालय , यशवंत हायस्कुल इ. प्रमुख आहेत. इंग्रजी माध्यम शाळांमध्ये प्रकाश पब्लिक स्कूल, विद्यानिकेतन इ.चा समावेश होतो.
महाविद्यालयामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील हे महाविद्द्यालय सर्वात जुने असून त्याची स्थापना १९६१ साली झाली. ग्रामीण भागातील एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून ते ओळखले जाते. पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हेविशेष नावारूपाला आले आहे. त्यामधून अनेक अधिकारी शासकीय पदावर कार्यरत आहेत.