Skip to main content

शहराविषयी

उरण इस्लामपूर हे एक सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख शहर असून, उरण इस्लामपूर नगरपरिषदेची स्थापना दि. १६-११-१८५३ रोजी झालेली आहे. सन २००१ चे जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ५८३३० इतकी आहे. उरण-इस्लामपूर नगरपालिका ही "ब" वर्ग नगरपालिका आहे. उरण-इस्लामपूर शहराचे क्षेत्र ४०४२ हेक्टर इतके आहे.

नरपालिका हद्दीत एकूण २६ वार्ड असून त्यामधून २६ नगरसेवक निवडून आलेले आहेत. तसेच नगरपालिकेत ३ नामनिर्देशित सदस्य आहेत. शहराचे पश्चिम हद्दीपासून पुणे बेंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ हा सर्वसाधारणपणे २.५ किलोमीटर असून, पेठ-सांगली राज्य मार्ग क्र. १३८ हा शहरातून जातो.

Banner
नागरी सुविधा

शहरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणेसाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. शहरात पाण्याच्या अनुक्रमे १) ७ लाख २) ७.५ लाख ३) ७.५ लाख लिटर्स क्षमता असलेल्या पाण्याच्या टाक्या असून सदर टाक्यांना ११ किलोमीतर अंतरावरून कृष्णा नदीतून दोन टप्प्यातून पाणी पुरविले जाते. उरण-इस्लामपूर नगरपरिषद ही वाटर मीटरद्वारे पाणीपट्टी आकारणी करणारी राज्यातील कदाचित एकमेव नगरपरिषद आहे.या गावापासून १० कि.मी अंतरावर नरसिंगपूर आहे. इस्लामपूर हे निमग्रामीन असे शहर आहे.या शहराचा मुख्य भाग उरण आहे तेथूनच खऱ्याअर्थाने शहराचा विस्तार झाल्याचा पहावयास मिळतो.म्हणूनच या शहराच्या आदि उरण हे नाव लावले जाते उरण-इस्लामपूर असे म्हंटले जाते.या उरण भागामध्ये मोठे मंदिर आहे.तेथे दरवर्षी शंभूआप्पाच्या नावाने आठ दिवस मोठया प्रमाणात उरूस भरतो.इस्लामपूर शहराच्या बाजूला राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना व त्या लगत मोठे राम मंदिर आहे.

Banner
शासकीय कार्यालये

इस्लामपूर हे शहर वाळवा तालुक्यात येत असले तरी तालुक्यासाठी असणारी सर्व शासकीय कार्यालये इस्लामपूर मधेच आहेत. यामध्ये तहसीलदार, प्रांत कार्यालय, पोलीस ठाणे,उपविभागीय पोलीस कार्यालय , फौजदारी व दिवाणी न्यायालय, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय , भूमिअभिलेख कार्यालय, सिटी सर्वे कार्यालय , मुद्रांक व दस्त नोदनी कार्यालय इ. प्रमुख कार्यालयांचा समावेश होतो.

Banner
शिक्षण

शहरामध्ये विविध प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आहेत.मराठी माधामिक शाळांमध्ये प्रामुख्याने आदर्श बालक मंदीर, इस्लामपूर हायस्कुल , विद्यामंदिर , सद्गुरू विद्यालय , यशवंत हायस्कुल इ. प्रमुख आहेत. इंग्रजी माध्यम शाळांमध्ये प्रकाश पब्लिक स्कूल, विद्यानिकेतन इ.चा समावेश होतो.

महाविद्यालयामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील हे महाविद्द्यालय सर्वात जुने असून त्याची स्थापना १९६१ साली झाली. ग्रामीण भागातील एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून ते ओळखले जाते. पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हेविशेष नावारूपाला आले आहे. त्यामधून अनेक अधिकारी शासकीय पदावर कार्यरत आहेत.

Banner

द्रुत दुवे