Skip to main content
 आपत्ती व्यवस्थापन

आपत्ती व्यवस्थापन

Submitted by admin on 24 February 2024

आपत्ती काळात जलद आणि प्रभावी प्रतिसाद कार्यान्वीत करण्यासाठी निरनिराळया यंत्रणांशी समन्वय साधण्याचे कार्य हा कक्ष करीत असतो. पुणे व सातारा जिल्हयातील सर्व नगर परिष्दांच्या, महाराष्ट्र शासन प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंंद्र म्हणुन घोषित केला आहे. पुणे मनपाचे सर्व खाते/विभाग, अपआयुक्त (परिमंडळ १ ते ४), महापालिका सहा. आयुक्त, शासनाचे विविध विभाग जसे कि आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस, अग्निशमन दल, जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्त कार्यालय, पाटबंधारे विभाग, हवामानशास्त्र विभाग असे इतर विभागांशी समन्वय ठेवण्यात येतो. त्याचप्रमाणे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष, राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, यांचेशी आपत्ती पुर्व व आपत्ती दरम्यान व नंतर समन्वय ठेवण्यात येतो.

  • सदर केंद्रस्थित असलेल्या शहरात उद्भवणा-या आपत्तीस तोंड देणे व त्वरित प्रतिसाद देणे यासाठी आवश्यक पुर्वतयारी करणे
  • अशा केंद्रास जोडुन दिलेल्या भागांसाठी, आपत्ती व्यवस्थापन केंद्र म्हणुन कार्यवाही करणे
  • आपत्तीत सक्षमपणे तोंड देण्याठी पुर्वतयारी करण्याची संकल्पना जनमानसात रुजविणे
  • आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन सक्षम बनविणे
  • मदत व बचाव पथके स्थापित करुन त्यांना प्रशिक्षण देणे
  • आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत साधनसामुग्रीची माहिती संकलित करणे व वेळोवेळी सुधारीत करणे
  • कोणत्याही आपत्तीस तोंड देऊ शकतील अशी सक्षम बांधकामे करण्यासाठी आवश्यक त्या तरतुदी करणे