अतिक्रमण विभाग
उद्दिष्टे :-
- नागरिकांना अनधिकृत बांधकाम व बेकायदेशीर फेरीवाले यांचा कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेणे.
- "फेरीवाला क्षेत्र" व "ना- फेरीवाला क्षेत्र" घोषित करणे व फेरीवाल्यांचे ना- फेरीवाला क्षेत्रामधून फेरीवाला क्षेत्रामध्ये पुर्नवसन करणे.
- शहराची फेरीवाल्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करणे.
- पदपथ, रस्ते इ. वरील बेकायदेशीर अतिक्रमण व अनधिकृत फेरीवाले यांचे अतिक्रमण काढणे.
- दवाखाने, रेल्वे स्टेशन, शाळा, धार्मिक स्थळे, सरकारी कार्यालये तसेच सायलेंट झोन इ. परिसर फेरीवाले अतिक्रमण मुक्त ठेवणे.
- उत्सवादरम्यान तात्पुरत्या स्वरुपाचे मंडप, सभा मंडप इ. उभारण्यासाठी परवानगी देणे आणि कोणत्याही प्रकारची वाहतुक कोंडी होणार नाही याची दक्षता घेणे
- Log in to post comments