मध्यवर्ती भांडार विभाग
मध्यवर्ती भांडार विभाग
एकापेक्षा जास्त सरकारी कार्यालयांसाठी मालाची खरेदी किंवा मालाची ऑर्डर मध्यवर्ती गोदाम खरेदी संस्थेद्वारे केली जाते. शासकीय कार्यालयांनी केलेल्या खरेदीचे संपूर्ण मार्गदर्शन "शासकीय विभागाकडून स्टोअर्स खरेदीसाठी कार्यालयीन प्रक्रियेचे नियमपुस्तिका" मध्ये दिलेले आहे.
- वस्तूंचे दरकरार संख्याकरार तसेच दरनिश्चिती करण्यासाठी शासनाने खालील समिती गठीत केलेली आहे.
- उपसचिव (उद्योग) - अध्यक्ष
- उपसचिव (वित्त) - सदस्य
- उद्योग सह संचालक (भांख) - सदस्य सचिव
- सार्वजनिक निवडणुकीसाठी आवश्यक असणा-या वस्तुंच्या खरेदीसाठी वरील सदस्यांव्यतिरिक्त उपसचिव, सामान्य प्रशासन विभाग / उपमुख्यनिवडणूक अधिकारी सभासद असून मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कडून "तातडीची खरेदी पध्दत" प्रमाण पत्र मिळवून तातडीची खरेदी करण्यात येते.
- दरकरार/संख्याकरार ई-निविदा पध्द्तीने करण्यात येते.
- मध्यवर्ती भांडार खरेदी संघटनेमार्फत मान्यताप्राप्त पुरवठादार म्ह्णून उद्योग संचालनालयाकडे नोंदणी करण्यांत येते.
खरेदी धोरण संबंधात इतर कार्यालयांना सल्ला:
निरनिराळया शासकीय कार्यालयांना वेळोवेळी वस्तू खरेदी करतांना खरेदी विषयक धोरणाची पूर्ण माहिती नसल्यामुळे अनेक अडचणी येतात. सबब, त्यांचेकडून प्राप्त झालेल्या अनौपचारिक संदर्भाचे निराकरण उद्योग संचालनालयाकडून करण्यात येते. तसेच काही शासकीय विभागांना काही विशिष्ट प्रकारच्या वस्तू मोठ्या प्रमाणावर लागतात. त्या खरेदी करण्याचे अधिकार अधिकार त्या त्या विभागांना देण्यात आलेले आहेत. असे विभाग शासन निर्णय दिनांक २ जानेवारी १९९२ नुसार खरेदी समिती स्थापन करतात त्यामध्ये या शाखेचे प्रतिनिधी सदस्य असतात.
- Log in to post comments